धावत्या रेल्वेसमोर दुचाकी सोडली मोठा अनर्थ टळला, दीड तास हायकोर्ट एक्स्प्रेस थांबली !

Foto

औरंगाबाद:  धावत्या धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेससमोर एका दुचाकीस्वाराने मोटारसायकल सोडून पळ काढला. त्यामुळे रेल्वे सुरक्षा पुन्हा धोक्यात सापडली आहे. या घटनेमुळे तब्बल दीड तास हायकोर्ट एक्स्प्रेस संग्रामनगर गेटजवळ थांबवून ठेवावी लागली. 

संग्रामनगर उड्डाणपुला दरम्यान एका दुचाकीस्वाराने रेल्वे समोर दुचाकी सोडून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठा अनर्थ झाला असता. रेल्वे सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस येत असल्याचे दिसत असतानाही एका दुचाकीस्वाराने रेल्वे पटरीवर दुचाकी आणली. हायकोर्ट एक्स्प्रेस समोर येताच दुचाकी सोडून दुचाकीस्वार फरार झाल्याचा प्रकार घडला. त्यातच हायकोर्ट एक्स्प्रेस वेग जास्त असल्याने ही दुचाकी रेल्वेने फरफटत नेली. त्यात काही चाव्या निखळून पडल्या. यामुळे मोठा अपघातही झाला असता. मात्र रेल्वे चालकाच्या लक्षात येताच त्याने कशी-बशी रेल्वे कंट्रोल करत थांबविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे रेल्वे काही तास थांबविण्यात आली होती. रेल्वे पोलिस येताच दुचाकीस्वाराचा शोध घटनेची माहिती कळताच रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा, विजय वाघ, दिलीप कांबळे तसेच रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंबर प्लेटस् गायब असल्याने दुचाकीस्वाराचा शोध लागला नाही. दुचाकीस्वाराचा शोध घेत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी सांगितले. नंबर प्लेटस् नसल्यामुळे रेल्वे पोलिसही संभ्रमात आहेत आहे. हा घातपाताचा प्रयत्न आहे की काय? असा प्रश्‍नही आता उपस्थित केला जात आहे.